सेतूबंधन

 बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरी
गिरिराजाचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जळात द्या रे जवे ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समिप लंकापुरी

मारुतीने लंकेत सीतामाई असल्याची बातमी आणल्यावर राम-लक्ष्म्ण आणि तमाम वानरसेनेने लंकेवर चढाईची तयारी सुरू केली. सगळी सेना सागर ओलंडून लंकेला पोहोचणार कशी? तर त्यासाठी सागरावर सेतू बांधणे प्राप्त होते. वानरांपासून खारीपर्यंत सगळे भिडले सेतुबंधनी. 




आता तुम्ही ओळखलं असेलच की हे पहिले शिल्प आहे पापनाथ मंदिराच्या देवकोष्ठातील. मला विशेषतः हे सेतुबंधनाचं शिल्प फार आवडतं. वर राम लक्ष्मणांबरोबर असलेलं वानर कसं मिष्किल आहे ना? आणि सेतु बांधणाऱ्या वानरांत दिसणारी गती, एक sense of common purpose, किती प्रभावीपणे  वठली आहे. इथे खरोखर कलांकारांनी पाषाणासारख्या कठीण माध्यमाला बोलतं केलं आहे.   पापनाथा मंदिरातील शिल्पांचं एक वैशिष्ठ आहे, की त्या शिल्पांवर त्यांच्या शिल्पकांरांची नाव अंकित आहेत. 



Comments