जिथे सागरा धरणी मिळते
आपला अरबी समुद्र खरंतर करड्या रंगाचा आहे. समुद्राची निळाई खरी कळली ती लंकेला जाउन हिंदी महासागर पाहिला तेंव्हा, आणि मग परत तोच महाजलधी ऑस्ट्रेलियातून पाहिला.
समुद्राच्या काठाकाठाने जाणाऱ्या रस्त्यांनी बऱ्याचवेळा प्रवास केला. प्रत्येक वेळी तो सुखावणाराच होता. आंजर्ले ते केळशी असो, चेनाई ते पॉंडिचेरी की पार गॉल ते कोलंबो पर्यंत चा असो. एका बाजुला सोबत करणारा समुद्र, रुपेरी चमकणारं पाणी, कोळ्यांच्या वस्त्या आणि खारा वारा.
असाच एक रस्ता ऑस्ट्रेलियात आहे, ग्रेट ओशन रोड - मेलबर्न जवळ ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर, टुर्ने ते ऍलन्सफोर्ड शहरांमध्ये २४३ किमी चा हा रस्ता आहे. महासागराच्या सोबतीने जाणारा महासागरमार्ग. निळाशार समुद्र, Indigo to turquoise सर्व छटांची उधळण. मध्येच लागणारी कोळ्यांची गावे. boardwalks. Fish and Chips ची दुकाने.
हा रस्ता, १९१८ मध्ये ह्याचे planning सुरु झाले. त्यावेळी, ही किनारपट्टीवर ची गावे, फक्त समुद्रमार्गेच जोडलेली होती. ह्या मार्गामुळे तिथल्या टिंबर व्यापाराला फायदा होता. हे, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या सैनिकांचे स्मारक आहे, जे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महायुद्धात भाग घेऊन परत आलेल्या सैनिकांनी बांधलं आहे. बांधकाम जवळ जवळ १९३२ पर्यंत चाललं. 3000 सैनिकांनी ह्या रस्त्यावर काम केलं. पहार, टिकाव, detonators वापरुन काम झालं. काम जोखमीचं होतं. कित्येक सैनिक कामी आले. त्यांना दिवसाचा १० शिलिंग्स आणि सिक्स्पेन्स पगार होता. रहायला तंबू होते आणि जेवायला मेस. शिवाय, मनोरंजनासाठी पियानो, ग्रामोफोन, वर्तमानपत्रे यांचीही सोय होती! हे काम चालू असताना, १९२४ साली कॅसिनो नावाची स्टीमबोट, कामाच्या जवळपास, रीफना थडकून अडकली. आणि त्या बोटीवरचा कार्गो काढून टाकावा लागला. हा कार्गो होता, बीअरचे ५०० बॅरल आणि दारूची १२० खोकी. सैनिकांनी ते सर्व हस्तगत केल्याने, रस्त्याच्या कामाला दोन आठ्वड्याची अनाधिकृत पेय्य सुट्टी मिळाली!
ह्या किनारपट्टीच्या पोर्ट कॅंपबेल भागात, चुनखडीच्या कड्यांचा सामना दक्षिण समुद्राच्या भणाण वाऱ्याशी आणि सतत आपटणाऱ्या लाटांशी होतो. आणि भव्य twelve apostles उभे ठाकतात!
Twelve apostles - हे येशु चे बारा अंतरंग शिष्य, last supper चे भागीदार. येशुनंतर, christian धर्माचे आधारस्तंभ. जणु ते इथे दक्षिण सागराशी येउन उभे ठाकले.
Suzzane Howard च्या कवितेचा स्वैर अनुवाद ..
Twelve Apostles
थबकलात दक्षिण दिग्विजयात
का विसावलात, बघुन किनारा?
तप करत अनंत वर्ष, मुक्तीचा घेऊन ध्यास ...
हार की जीत तुमची
हा दक्षिणजलधी?
हे तुषार, तुमचे हसू का आसू ?
बंदी तुम्ही की तटबंदी?
ह्या कातळ - वादळाच्या झुंजीत,
आमच्या विस्फारलेल्या नजरा जाणवतात तुम्हाला?
आम्ही घडीचे प्रवासी इथे
आणि तुम्ही
तारकाभरल्या विश्वाचे अखंड साक्षीदार
ह्या सीमारेषेवर, खडे रात्रंदिन

Comments
Post a Comment