रामकथा
रामकथा, सगळ्या कलाकारांना कायम आकर्षित करत आली आहे. आदिकवी वाल्मिकींपासून आपल्या ग.दि, माडगूळकरांपर्यंत अनेक सिद्धहस्त कवींनी रामकथेवर आपल्या प्रतिभेचा साज चढवला आहे.
साहित्यात जसे रामकथेचे रामचरितमानस ते गीतरामायणासारखे अनेक आविष्कार आहेत, तसेच शिल्पकारांनाही या रामकथेने भुरळ पाडली आहे.
पट्ट्दक्कल चे पापनाथ मंदिर असो वा हंपीचे हजारराम मंदिर, शिल्पकारांनी आपल्या प्रतिभेने रामकथा जिवंत केली आहे.
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा - रामाच्या नवरात्राचा प्रारंभ. ह्या रामाच्या नवरात्रीनिमित्ताने ह्या शिल्परामकथेचं एक पारायण करूया.
ते प्रतिभेच्या आम्रवनातील
वसंत वैभव गाते कोकील
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती
Comments
Post a Comment