रावण वध

 राम नवमीच्या सगळ्यांना हर्दिक शुभेच्छा!

आज ह्या रामकथेचा शेवटचा भाग. वानर सेनेचे राक्षसांबरोबर तुमुल युद्ध झाले. रावणाचे मुलगे कामी आल्यावर, रावण स्वतः युद्धात उतरला. राम रावणाचे घनघोर युद्ध झाले, आणि शेवटी रणरंगधीर श्रीरामांचा बाण हृदयी लागून रावण वध जाहला. तो दिवस होता, विजयादशमी चा. 

देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला
हा श्रीविष्णु, कमला सीता
स्वये जाणता असुनि, नेणता
युद्ध करी हे जगताकरिता
दाखवी अतुल रामलीला 



हा युद्ध प्रसंग आहे हजारराम मंदिरातला. नेहमी आपण बघतो ते रामचतुष्टय (राम, लक्ष्मण, सीता व हनुमान. पंचायतनात भरत ही असतो) आपल्या सन्मुख असते. हे हजाररम मंदिरातले चतुष्टय मात्र प्रोफाईल मध्ये कोरले आहे.



आणि हे रणरंगधीर रामाची मुर्ती. ही पाटणच्या रानी की वाव येथे स्थित आहे. सामान्यत: आपल्याला कोदंडधारी राम अर्थात धनुष्यधारी राम पहायला मिळतो. हा रामराया मात्र धनुष्याबरोबर ढाल तलवार घेऊन उभा आहे. 

Comments