हैदराबाद

२०१९ च्या सफरींची सुरुवात हैदराबादपासून केली.  ४ दिवस बेगमपेट भागात राहिलो. मानसरोवर फर्न झकास हॉटेल आहे.
पहिल्या दिवशी गोळकोंडा आणि कुतुबशाही टूंब्स पाहिली. 
हैदराबादमध्ये तीन राजवटी नांदल्या. काकतेय, कुतुबशाही आणि निजामशाही.
गोळकोंडा -  ज्याचा मूळ अर्थ गवळ्यांचा किल्ला असा आहे, तो मुख्यत: कुतुबशहांचा. एकदा औरंगजेबाने तो फितुरीने जिंकल्यावर आलेला निजामशहा हैदराबादमध्येच  रहिला.




कुतुबशाहीचे ७ सुलतान होते. ते सुलतान झाले की पहिलं काम सुरु करायचे ते म्हणजे आपलं थडगं बांधायला घ्यायचे. अशी ६ थडगी गोळकोंड्याच्या बंजारा गेट बाहेरील जागेत आहेत, बरोबर त्यांच्या बहिणी, बायका, नाटकशाळांची थडगी आहेत. ७ व्या सुलतानाला औरंगजेब कैद करून औरंगाबादला घेउन गेला. त्यामुळे त्याचं थडगं अर्धच राहिलं





रामोजी सिटी हे एक मद्रास प्रोडक्षन आहे. तसंच भव्य, झगमगीत आणि लाऊड माणसांनी गजबजलेलं.



Comments