हवा के साथ साथ

पायाला लागलेली पहिली भिंगरी म्हणजे सायकलच . लहानपणी सायकलवर टांग टाकून फिरताना सर्व जग आपल्या reach मध्ये आल्यासारखे वाटते. मला लहानपणी बाबांच्या सायकलवर पुढे बसून जाताना खूप मज्जा यायची तो माझा आणि बाबांचा quality time होता.

आमच्या areaमध्ये cyclothon ची announcement झाली तेंव्हा सायकल चालवायची इच्छा जागृत झाली. हा एक challenge होता. १२ कि.मी. cycling करत जायचे होते. सकाळच्या धुक्यात cyclothon ची सुरुवात झाली. झोंबऱ्या वाऱ्याबरोबर स्पर्धेने जोर पकडला. पवना नदीवरचा पूल आला. नदीवर अजूनही धुके रेंगाळत होते. त्यात उगवणारा सूर्य खूप छान दिसत होता. एकीकडे तिथेच थांबून सूर्योदय बघावा असे वाटत होते. पण दुसरीकडे एवढे मागे टाकलेले cyclist पुढे निघून जातील हा विचारही अस्वस्थ करत होता. Finally competitiveness won.
ह्या cyclothonमुळे पूर्वी केलेल्या cycle फेऱ्या आठवल्या. College मध्ये असताना पाचगणीमध्ये सायकल घेऊन फिरलो होतो. तेंव्हा प्रत्येक माळरानावर पिवळी,जांभळी , गुलाबी रानफुले फुलली होती. आणि त्यावर पडणारा मावळता सूर्य. कधीही ना विसरणारा नजरा . दुसरी आठवण म्हणजे Bahamasमध्ये cycle चालवत एका ऊंच टापूवर पोचलो. श्वास सुद्धा घेता येत नव्हता आणि वर पोचल्यावर दूरवर दिसला तो निळाशार समुद्र आणि पांढरी पुळण. Amesterdam आणि Barcelona मध्ये सायकलवरून मारलेली फेरी.
जसा शेवटचा टप्पा आला तसा एक प्रकारचे समाधान वाटू लागले. लांब पल्लापण जमू शकतो हा विश्वास आला. ही कदाचित माझ्या “The Bicycle Diaries” मधील पहिली एन्ट्री असेल आणि there may be many more to come...

Comments

Post a Comment