अहिल्योद्धार



रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहले
तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती
माझी मज ये पुन्हा आकृती
मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन ही पाउले
विश्वामित्रांबरोबर यज्ञ सुरक्षेसाठी   लक्ष्मणासह निघालेल्या रामाने अहिल्यारूपी शिळेला चरणस्पर्श करून आपले पुर्वरूप मिळवून दिले. 

हा प्रसंग कोरला आहे हजारराम मंदिराच्या भिंतीवर. 

हजारराम मंदिर, हंपीच्या इतर मंदिरांपेक्षा वेगळ जाणवते. हंपीच्या परिसराचे, देव परिसर, राज परिसर असे विभाजन दिसून येते. विरूपाक्ष, अच्युतराय अशी मंदिरे हंपी देवाची मध्ये आहेत, तर हजारराम मंदिर हे राजप्राकारात आहे. 


Comments