लंकादहन

लीलया उडूनी गगनात
पेटवी लंका हनुमंत

नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी ते पुच्छ मागुती
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करी महावात

जटायुने सांगितल्या दिशेने शोध घेत, अंगद, मारुती इ. सागरतिरी पोहोचले. मारुतराया सागर ओलांडून लंकेला पोहोचले. अशोकवनात, सीतामाईंना मुद्रिका देऊन रामाचे कुशल सांगून ते लंका बघायला निघाले.  रावणाच्या दरबारात पोचले. राक्षसांनी त्यांचे पुच्छ पेटवेले, तर हनुमंताने सगळी लंका पेटवून दिली!





या शिल्पप्रसंगासाठी, आज आपण हंपीच्या विजय विठ्ठ्ल मंदिरात जातोय. हे मंदिर विजयनगरच्या देवराय II आणि कृष्णदेवरायांनी बांधले. ह्या मंदिराचा परिसरअवाढव्य आहे. बाजार, पुष्करिणी, भक्तिमंडप, कल्याणमंडप, गरुडरथ  संगीत स्थंभ अश्या विशेष इमारतींनी नटलेले विठ्ठ्ल मंदिर जरूर पाहाण्या सारखे आहे.  हा आपले पुच्छ मुरडून त्यावर बसलेला मारुतराया आणि गर्विष्ठ रावण, कल्याण मंडपाच्या समोरा-समोरील खांबावर कोरले आहेत. 

Comments