लोका सांगे

 (नेहमीची वर्दळ नसल्याने शांतता पसरेलेली होती. झांटिपी आणि बोका खिडकीतून बाहेर बघत बसले होते. एक रुग्णवाहिका,  भेसूर सायरन वाजवत रस्त्यावरून गेली. दोघांनी त्या वाहिकेचं जाणं दिसलं तोवर follow केलं.

बोका:  स्टॉईसिजम (Stoicism) नावाची ग्रीक तत्वज्ञानाची एक शाखा आहे. Stoic तत्वज्ञान असं प्रतिपादन करतं की चांगले दिवस असो की वाईट दिवस असो, माणसाने धीरोदात्तपणे वागावं. भावनांच्या आहारी न जाता नीतिपूर्ण चांगले आचरण ठेवावे. माणसाच्या तत्वज्ञानाची ओळख तो काय बोलतो, ह्याने होत नसून तो कसा वागतो, विशेषत: कठीण प्रसंगात कसा वागतो याने होते. 

येणारी परिस्थिती माणसाच्या हातात नाही, पण त्या परिस्थितीचा सामना  सदाचार न सोडता,  gracefully  करणं त्याच्या हातात आहे. त्याने आपल्या आचरणावर लक्ष द्यावे. 

स्टॉईक हे नुसतं सांगून थांबत नाहीत, तर ते आचरणात आणण्याची साधना करतात, म्हणजे चांगले दिवस असतानाही austerities म्हणजे हलाखीच्या परिस्थितीत राहायचा सराव करतात.  

झांटिपी: म्हणजे  मटार उसळ असो वा दुधीची भाजी, माणसाने सारख्याच समाधानाने जेवावे.  एवढेच नव्हे तर याचा सराव म्हणून आठवड्यात एकदा दुधीची भाजी करावी!  हे तत्वज्ञ संसार कठीण करून ठेवतात बघ! 

 (बोक्याने सुस्कारा सोडला, आणि परत ते दोघे खिडकीबाहेर बघू लागले.) 


Comments