जलदापाराचं जंगल

जलदापाराचं जंगल येतं उत्तर बंगालात, हिमालयाच्या पायथ्याशी. हे जंगल प्रसिद्ध आहे ते एकशिंगी गेंड्यांसाठी.  तोर्षा नदीकाठचा, हा एकेकाळचा हत्तींचा  corridor.

घनदाट झाडीचा पाणथळ भाग. पात्र बदलणारी नदी. त्यातच खेडी आणि खेड्याचा आव आणणारे रेसोर्ट्स.
जलदापाराच्या हॉलॉंग सेंटर पासून आम्ही हत्तींवर बसून जंगल सफर केली.
आत्तापर्यंत केलेल्या सफरी उघड्या जीपमध्ये केलेल्या, खास आखून दिलेल्या धुळरस्त्यांनी, काबिनीत, ताडोबाला, अगदी मसाई मारात ही. पण  हा एक वेगळाच अनुभव होता.  हत्तीवर सवार झालो. दोन हत्तीणीवर आमच्या आठ सवाऱ्या आणि बरोबर  त्यांची एक वर्षाच्या आतबाहेर ची दोन पिल्लं. त्या पिल्लांना घेतल्याशिवाय त्या निघतच नाहीत म्हणे. अशी आमची वरात निघाली. त्यांच्या चालण्याचा एक वेगळी आंदोलीत लय होती.

दोघीजणी आपल्या पिल्लांना मध्ये ठेवत पार जंगलात शिरल्या. वाट अशी काही नव्हतीच. आपल्या आवडीच्या वेली पाने आवर्जून खात निघाल्या होत्या.




सलामीलाच आम्हाला हा गेंडा दिसला. मजेत उभा होता. मला एकाच वेळेला तिरंगा आणि खग्ग विसाण कप्पो आठवलं.  कश्या असतात ना associations!

भारी नग होता हा. त्याला उजवी घालून पिलांना डावीकडे ठेवत काफिला पुढे निघाला.आणि ओहोळ, दाट झाडी पार करत गजगतीने मुक्कामी परत आला.


पिल्लांना भूक लागली होती.

आम्हाला पण...
आम्ही पुरी भाजी आणि मिष्टी च्या शोधात निघालो.

Comments