तीस्ता नदी है चंचला
"तीस्ता नदी सी तू चंचला, मै भी हूं बचपन से मनचला" असं गाणं आहे डोक्यात, मला ते डॅनी चं असेल असं वाटलं, पण येसुदास, हेमलता यांनी दुरदर्शन साठी गायलं आहे. ही तीस्तेशी पहिली ओळख.
उत्तर सिक्कीम च्या त्सो लामा सरोवरात उगम पाऊन बांगलादेशात ब्रम्हपुत्रेला मिळते. पण आहे खरी ती दार्जिलिंग - सिक्किम - कॅलिंपॉंग ची पाचूच्या रंगाची, अवखळ सुंदरी.
आम्हाला कॅलिंपॉंग जवळ या अवखळ नदीच्या अंगाखांद्यावर खेळण्याची संधी मिळाली, रिवर राफ्टींग करुन. नदीच्या वरच्या भागात, कसलेल्या खेळाडूंसाठी लेवल 4 -5 चे राफ्टींग आहे, पण आम्ही लिंबूटिंबू असल्याने 2 -3 लेवल चे राफ्टींग केले. दंगा मात्र भरपूर केला. डिसेंबरचे दिवस आणि बर्फाचे थंड पाणी. त्याचे शिपकारे अंगावर घेत उड्या मारणाऱ्या पाण्यातली सफर - मजा आ गया!
कॅलिंपॉंग च्या टेकड्यातून खडकांवरून उड्या मारत येणाऱ्या तीस्तेला पायथ्याशी येऊन भेटते रंगीत. गर्द हिरव्या रंगाची नदी आहे ही आणि नाव रंगीत!
त्या संगमानंतर थोडी प्रौढ होऊन, सेवॉक पाशी तीस्ता मैदानात प्रवेश करते. तिच्यावरचा हा कॉरोनेशन ब्रिज.
Comments
Post a Comment