वालीनिर्दालन
शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता
धर्मे येते त्यास पुत्रता
तू भ्रात्याची हरिली कांता
मनी गोपुनी हीन प्रलोभन
मी धर्माचे केले पालन
वालीवध ना खलनिर्दालन
सीतेचा शोध घेत राम लक्ष्मण किष्किंधेजवळ पोहोचले, तिथे त्यांना हनुमान, सुग्रीवादि वानर भेटले. समदु:खी सुग्रीवाला मदत करत राम रायांनी वाली वध केला.
ही शिल्पे आहेत, पट्टदक्कल च्या पापनाथ मंदिरातील. पापनाथ मंदिरातील शिल्पे देवकोष्टामध्ये स्थापलेली आहेत, आणि ती हजार राम मंदिरतील शिल्पांपेक्षा आकाराने जवळ जवळ दुप्पट आहेत. मुर्तींची आभुषणे, विशेषत: शिरोभुषणे वेगळ्या पद्धतीची दिसून येतात.
पापनाथ मंदिर हे पट्ट्दक्कल समुहातील इतर मंदिरांपासून लांब, अर्धा किमि बाजुला नदीकिनारी उभं आहे. रामायणाप्रमाणेच किरातार्जुनीय प्रसंग ही ह्या मंदिरात शिल्पीत आहेत.
Comments
Post a Comment