सीताहरण

सीताहरण

रामाचा बाण लागून मरता मरता, मायावी मारीच ओरडला "धाव लक्ष्मणा! धाव सीते!" आपल्या नावाची रेषा ओढून नाईलाजाने लक्ष्मण रामाचा शोध घ्यायला वनात गेला. हा डाव साधून याचक रूपातला रावण पर्णकुटीशी आला, गृहस्थ धर्माची मर्यादा सांभाळण्यासाठी, सीतेने लक्ष्मणरेषा ओलांडली, घात झाला,  ती क्षात्राणी रावणाला सांगू  लागली

कामव्यथेची सुरा प्राशुनी
नकोस झिंगु वृथा अंगणी
जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नात
घननीळाची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात. 


गाढवं जोडलेल्या रथातून आकाशमार्गाने सीतेला पळवून नेणारा रावण - हजार राम मंदिरातील शिल्प 

परतून आलेल्या राम-लक्ष्मणांना सगळा प्रकार ध्यानात आला,  ते सीतेच्या शोधात निघाले, खाणाखुणा शोधत असता, त्यांना जखमी होऊन पडलेला जटायु भेटला. 

तो नृशंस रावण कामी
नेतसे तिला का धामी
जाणिले मनी  सारे मी
चावलो तयाच्या हाता, हाणिले पंख मी माथा
अडविता खलासि पडलो,  पळविली रावणे सीता 


रावणावर पंखांचे वार करणारा जटायु -  हजार राम मंदिरातील शिल्प 

Comments