दम मारो दम
हंपीचे दोन भाग पडतात आणि हे दोन भाग तुंगभद्रा नदीमुळे तयार झाले. एक भाग विजयनगर साम्राज्यासाठी प्रसिद्ध आणि दुसरा रामायणात उल्लेखलेल्या स्थळांसाठी. इथे पंपा सरोवर , शबरी आश्रम व हनुमानाचा जन्म झाला ती टेकडी आहे आणि आता त्याला एक हिप्पी angle पण आहे.
पण त्याआधी माझा encounter वर्णन करून सांगितला पाहिजे. आमचा विजयनगर बघून दुसऱ्या side ला जायचा plan होता. हिवाळा असल्यामुळे अंधार खूपच लवकर पडला. कोणी सांगितले की जर तुम्ही बोटीने नदी पार केली तर स्वस्त पडेल. घाटावर आलो तर मिट्ट काळोख.घाट निर्मनुष्य होता. दूरवर घरांचे etc लाइटही दिसत नव्हते.समोर काय आहे याचा अंदाजही येत नव्हता. मोबाईलच्या प्रकाशात ठेचकाळत चाललो होतो. मी आणि दोन्ही मुली. नेहमीप्रमाणे नवरा झपाझप चालत पुढे गायब.
आता जरा पात्रपरिचय . मोठी मुलगी , तिला आपण A1 म्हणू. नको त्या वेळी नको त्या शंका काढून डोक्याला कल्हई करणे हा तिचा time pass. केनियामध्य समोरून hippo पळत येत असताना केनियामध्ये सर्वात जास्त म्रुत्यु hippo मुळे होतात ही माहिती देऊन तिने प्रसंगाची रंगत वाढवली. तुंगभद्रा नदीमध्ये मोठ्या मगरी असतात ही माहिती पचकून thrill अजून वाढविले.
धाकटी कन्या हिला A2 म्हणू . Tiger किंवा गब्बर हे तिचे nicknames आहेत. पण ऐन प्रसंगी तिची भीतीने गाळण उडालेली असते. ती आत्ता इतकी टरकली होती आणि मला चिटकून चालली होती.
ही आमची circus बघून नाव (?? नाव का म्हणायचे, टोपलीच होती मोठीच्या मोठी) चालवणार्यांना आमची दया आली. त्यांनी हाक मारली आणि तिथे गेलो तर नावाडी फिरंगी कन्यांना किनाऱ्यावर आणून सोडत होता आणि आदबीने tissues हवेत का ? असे विचारत होता.
नावाड्याने आम्हाला अंधारात नदीच्या पल्याड सोडले.आकारमानाप्रमाणे टोपलीत जागा ठरवून दिल्या. पूर्ण अंधारात त्याने कशी टोपली वल्हवली त्याचे त्याला माहीत. मी तुंगभद्रेतील मगरींचा विचार करत सगळ्यांना हातपाय टोपलीत ठेवायबद्दल continuous सूचना देत होते
दुसऱ्या काठावर आल्यावर हा हिप्पी भाग म्हणजे तुम्हाला गोव्याची आठवण करून देणारा होता. रस्त्यालगत छोट्या खोल्यामध्ये पायजमे आणि झब्बे घालून राहणारे foreigners. प्रत्येक खोलीत एकतरी वाद्य होतेच. टू व्हिलर वरून फिरणारे परदेशी. दुकानामध्ये bright रंगाचे तांत्रिक designचे शर्ट , bags , कपडे होते.भिंतीवर मस्त केलेली graffiti. Restaurants मध्ये भिंतीवर decoration म्हणून काढलेले देवादिक, Restaurants च्या मेन्यूमध्ये परदेशी cuisines ची रेलचेल होती
अप्रतिम निसर्गसौंदर्य, हिरवीगार भाताची शेते, नितळ पम्पा सरोवर, हनुमान टेकडीवरून बघितलेला सूर्यास्त, मदतीला तत्पर असलेले आणि एकदम relaxed locals.
अप्रतिम निसर्गसौंदर्य, हिरवीगार भाताची शेते, नितळ पम्पा सरोवर, हनुमान टेकडीवरून बघितलेला सूर्यास्त, मदतीला तत्पर असलेले आणि एकदम relaxed locals.
विजयनगरचे वैभवशाली अवशेष बघून डोळे दिपून गेले आणि हंपीची ही दुसरी बाजूही मन मोहवणारी आहे.
Comments
Post a Comment