निळे पाणी

       

 बंगालच्या उपसागरात अगदी मोक्याच्या जागेवर असलेली अंदमान बेटे. एका बाजूला म्यानमार, थायलंडची किनारपट्टी तर दुसऱ्या बाजूला भारताचा पूर्व किनारा.
         अंदमान बेटे त्याच्या निळ्याशार समुद्र ,पांढरा शुभ्र वाळूचा किनारा आणि वाळूवर शंखशिंपल्याची नक्षीसाठी प्रसिद्ध आहे आणि अजून एका  गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे scuba आणि snorkeling.
Snorkeling मध्ये डोळ्याला goggle आणि तोंडात श्वास घ्यायची नळी धरून शांतपणे पोहत समुद्रतळाची मज्जा घ्यायची.खाली वेगवेगळ्या प्रकाराचे प्रवाळ ,मासे बघत बघत जाणे हे एक वेगळेच thrill आहे. एकदा नळीने श्वास घेणे आणि simultaneously हातपाय हलवायचे गणित जमले की झाले.

 Guide ने basic instructions दिल्या. एकूणात मी,नवरा आणि A1 पोहण्यात हुशार दिसल्यामुळे आम्हांला त्याने आपआपले  snorkeling करायची परवानगी दिली. आमची बोट फर्लांगभर लांब उभी होती आणि पुढे एका समुद्री चाच्याचा खजिना लपविण्यासाठी योग्य असे बेट दिसत होते. Snorkeling करताना त्या बेटाभोवती प्रदक्षिणा मारायची होती. Guide ने एक शिट्टी काढली आणि ती जोरात वाजवली. शिट्टीच्या आवाजाने बधिर झालेले कान पूर्वावस्थेत येईपर्यंत ती शिट्टी वाजल्यावर काय करायचे हे कळलेच नाही. Guide तोपर्यंत बाकीच्या लिंबू टिंबूना एका tire ला बांधून फिरवायला घेऊन गेला. मागे वळून नवर्याने ह्यातले काही ऐकले का हे बघितले तर तो आणि A1 पायातले fins हातात घालून पाण्यात कोलांट्या उड्या मारत होते. Family मधील सर्वात sincere माणूस हे पद खूप जिकरीचे असते. पाण्यात शिट्टी ऐकू कशी येणार,ऐकू आलीच तर करायचे काय असे भुंगे डोक्यात घेऊन snorkeling सुरु केले.

अवर्णनीय, mind blowing असेच वर्णन करता येईल. वेगवेगळे प्रवाळ ,समुद्री काकड्या ,समुद्री गवत ,sea urchins, वेगवेगळ्या प्रकारचे , आकाराचे , रंगाचे मासे बघत दोन तास कुठे गेले पत्ता पण लागला नाही. आयुष्यात एकदा तरी snorkelling करून बघावेच. पण snorkeling करताना एक गोष्ट नक्की करावी. एक तर पूर्ण अंगभर swimming dress घालावा. सलमान खान होऊन snorkeling केले तर पाठीचे भजे होते. प्रवाळाला हातपाय लागून बर्यापैकी खरचटू शकते.

            Guide ने जेवण्याची सोय एका निर्मनुष्य बेटावर ठेवली होतो. एखाद्या Hollywood च्या Picture मध्ये शोभेल असा हा Beach होता आणि इतक्या शंखशिंपल्याची रेलचेल
होती. अंदमानमध्ये एवढे शंखशिंपले आणि प्रवाळ दिसायला भारत सरकार कारणीभूत आहे. तुम्ही आठवण म्हणून काही घेऊन जाऊ शकत नाही. Strict checking होते.

            निळेशार पाणी आणि serene beaches ची सर्व रुपे साठवत आणि पुन्हा यायचेच ही खुणगाठ घालत त्या बेटाला टा टा केला.

Comments