Skip to main content

Posts

Featured

काक: कृष्णः पिकः कृष्णः

 झांटिपी  खिडकीतून शोधक नजरेने बघत आहे, बोका दिवसातली साडेआठवी गोलकुक्षी संपवून अंग ताणत खिडकीपाशी येतो. बोका: काय ग, काय एवढी वाकून बघतेस खिडकीतून?  झांटिपी: अरे, ती लेखकीण कुठे दिसतेय क बघत होते. बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही आपल्यावर, आणि दिसली पण नाही मला कुठे! बोका: अग, लाईक्स - शेरे मिळेनासे झाल्याने थांबवलं असेल तिनं, माझं तरल आणि हुशार बोलणं सामान्यांना कुठे समजणार? बरं ते जाऊ दे, तू खिडकीतून बघत होतीस, तेंव्हा तुला काळी जाताना दिसली का?  झांटिपी: सर्जा! असं कोणाच्या कमीपणावर नये बोट ठेवू! असं काळी म्हणू नये कोणाला! बोका: ए माणूस बाये! एकसक्यूज मीच बरका! कोणाचा कमीपणा? सगळ्या मांजरात देखणी आहे माझी काळी! माझी दिल की धडकन!  इतर एकाही भाटीला तिच्या मागच्या पंजाच्या नखाची सर नाहीये!  झांटिपी; ओह, ती डेस्डेमोना कॅट होय समोरच्यांची? मला वाटलं शर्वरी नाहीतर निकिताला काळी म्हणतोयस तू! बोका: झांटिपे, तुम्हा माणसांसारखी दांभिक जात नाही बघ जगात! मनात सगळ्यांच्या असतं पण "काय बोलायचं नाही" ह्याचे शिष्टाचार बनवतात लेकाचे. बुटकं म्हणायचं नाही, काळं म्हणायचं नाही! अरे! बुटके ही आक

Latest Posts

पाऊस, कविता आणि बेडूक

मोजमाप

भाईचारा

भज गोविन्दं

बाजीचा ए अतफाल

लोका सांगे

पुस्तक

रावण वध

सेतूबंधन

लंकादहन